चंद्रपूर: 4 सप्टेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन | Batmi Express

Be
0

Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur  News,Chandrapur News IN Marathi,

चंद्रपूर दि. 29
: सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांच्या  अध्यक्षतेखाली  लोकशाही  दिनाचे  आयोजन  दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्यात येते. या लोकशाही  दिनानिमित्त  नागरीक व शेतकरी  जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करतात.

सोमवार, दि. 4 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे लोकशाही   दिनाचे  आयोजन  करण्यात आले आहे.  जिल्हास्तरीय  लोकशाही  दिनात तक्रार सादर करतांना विहित नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत तसेच अर्ज 15 दिवसाआधी 2 प्रतीत सादर करावा. तक्रार व निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. तद्नंतरच तक्रार अर्ज स्वीकारण्यात येईल, असे तहसिलदार (सामान्य) श्रीधर राजमाने यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->