Murder: 17 वर्षीय तरुण युवकाची मित्रांनी केली हत्या | Batmi Express

Be
0

Nagpur,crime Nagpur,nagpur news,Nagpur Crime,Nagpur LIve,

नागपूर:- नागपूर शहरात आणि परिसरामध्ये गुन्हेगारी मध्ये वाढ झाली आहे. हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत डोंगरगाव परिसरात सक्षम कैलास तीनकर या 17 वर्षीय तरुण युवकाची हत्या करण्यात आली आहे. आरोपी सौरभ उर्फ बादशाह पंधराम व त्याचे सात विधिसंघर्षग्रस्त बालकाने मिळून ही हत्या केली आहे. 

सूत्रानुसार, जुन्या भांडणाचे सेटलमेंट करण्याच्या उद्देशाने आरोपीनी मृतकाला डोंगरगाव परिसरात बोलविले व तेथे सक्षम तिनकरची हत्या केली. आरोपी व मृतक हे वर्धा रोड छत्रपती चौक येथील संताजी कॉलेज येथे शिक्षण घेत होते.

पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्यात येत आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलीस तपास:

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक सक्षम तिनकर व आरोपी सौरभ पंधराम यांच्यात पूर्वीपासून भांडणाचा इतिहास होता. मृतक तिनकर याने सौरभ पंधराम ला मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आरोपींनी मृतकाला धमकी दिली होती.

28 ऑगस्ट रोजी आरोपींनी मृतकाला डोंगरगाव परिसरात बोलविले. तेथे आरोपींनी मृतकावर हल्ला केला व त्याला ठार केले.

नागपूर शहरात वाढती गुन्हेगारी:

नागपूर शहरात आणि परिसरामध्ये गुन्हेगारी मध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक गंभीर गुन्हे घडले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->