Suspension Action: कर्मचाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार - एसडीओ वाघमारे | Batmi Express

Aheri,Gadchiroli News,Gadchiroli Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Batmya,
Aheri,Gadchiroli News,Gadchiroli Live News,Gadchiroali,Gadchiroli live,Gadchiroli Batmya,

अहेरी
: महाराष्ट्र राज्य शासनाने सरकारी कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू केला आहे. पाच दिवसासाठी सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 अशी वेळ ठरवून दिली आहे. 
मात्र अहेरी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित न राहणे, लवकर निघून जाणे, कामात दिरंगाई करणे, निष्काळजीपणा दाखवित असल्याचे एसडीओ वाघमारे यांना निदर्शनास आले. याबाबत त्यांनी कर्मचा-यांना सुचनाही केली. मात्र सुधारणा होत नसल्याचे बघून त्यांनी या कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी निलंबनाच्या कारवाईचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या कर्मचा-यांना लेटलतीफ, निष्काळजीपणा चांगलाच भोवण्याची चिन्हे आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.