चंद्रपूर: अमलनाला धरणात एकाचा बुडून मृत्यू | Batmi Express

Be
0

 

Korpana,Drowned,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,

कोरपना:- गडचांदूर पासून थोड्याच अंतरावर असलेल्या अंमलनाला डॅमच्या वेस्ट वेअर वरून वाहणाऱ्या पाण्यात बुडून एक तरुण मृत्यू पावला पाऊस कमी पडल्याने सध्या वेस्ट वेअर वरून पाणी वाहत नसतानाही सुट्टीच्या दिवशी पर्यटक येथे येत आहे. याच पार्श्वभूमीवर 15 ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनी याठिकाणी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शुभम शंकरराव चिंचोलकर' वय वर्ष 32, रा. दाताळा चंद्रपूर, असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो मित्रासोबत अमलनाला डॅम येथे फिरण्यास आला होता.

हे देखील वाचा:

आज दुपारी अंदाजे 2 वाजताच्या सुमारास पोहता येत नसताना सुद्धा त्याने डॅमचे वेस्ट वेअर येथील खोल पाण्यात उडी मारल्याने तो पाण्यात बुडून मरण पावला. घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढले. आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->