आरमोरी: देऊळगाव राजस्व रीक्षक मंडळ अंतर्गत येत असलेल्या तलाठी कार्यालय वडधा येथील तलाठी कवडो यांनी डार्लिं परिसरातील अवैध मुरूम डॉक्टर वाहतूक होत असताना ट्रॅक्टर पकडले आणि ट्रॅक्टर धारकावरती कारवाई न करता मोबदला म्हणून ट्रॅक्टर धारकाला तब्बल पंधरा हजार रुपयाची मागणी केली.
हे देखील वाचा:
|आरमोरी: पोलिस नाईक 5 हजाराची लाच घेताना अटक
मात्र ट्रॅक्टर धारकाने पंधरा हजार रुपयाची लाच न देता त्याने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या कार्यालयशी संपर्क साधला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लगेच सापडा रचून वडधा येथील तलाठी कवडो यांना 15000 रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले या घटनेमुळे आरमोरी तालुक्यात व महसूल प्रशासनात मोठी खळबळ माजली आहे. कवडो यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अधिकाऱ्यांनी आरमोरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती हाती आली आहे. आरमोरी येथील तलाठी कवडो यांच्या टाडूरवार नगर आरमोरी येथील किरायाच्या घराचे चौकशी सुरू असल्याची असंल्याची माहिती हाती आली आहे.