ब्रम्हपुरी: लाखापूरच्या सरपंच चंद्रकला मेश्राम यांचा स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार | Batmi Express

Be
0

Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Bramhapuri News,Sawali News,Bramhapuri Live,

ब्रम्हपुरी:- केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने जिल्ह्यातील "हर घर जल" योजनेअंतर्गत चांगले काम केलेल्या व्यक्तींना लाल किल्ला, दिल्ली येथे स्वातंत्र्यदिनी 15 ऑगष्ट रोजीच्या समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी विशेष पाहुणे म्हणून ब्रम्हपुरी  तालुक्यातील लाखापूरच्या गावच्या सरपंच चंद्रकला मेश्राम यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील लाखापुर येथील सरपंच चंद्रकला मेश्राम यांचा यात समावेश असून स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीमती मेश्राम यांचा सत्कार होणार आहे.

केंद्र शासनाने चंद्रपुर जिल्हयातील ब्रम्हपुरी तालुक्यातील लाखापुर येथील सरपंच चंद्रकला मेश्राम यांनी, जलजीवन मिशन योजनेमध्ये दिलेल्या योगदानाची दखल घेतली आहे. 15 ऑगष्ट रोजी  दिल्ली येथे होणा-या समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी सरपंच चंद्रकला मेश्राम आणी त्यांचे पती यांना उपस्थित राहण्याबाबतचे निमंत्रण केंद्र शासनाकडून देण्यात आले आहे.  या कार्यक्रमाला चंद्रपुर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) नुतन सावंत यांना महाराष्ट्र राज्याकडून या कार्यक्रमाचे नोडल अधिकारी म्हणुन नियुक्त करण्यात आले आहे. चंद्रकला मेश्राम यांच्या  निवडीबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

हे देखील वाचा:

चंद्रपुर जिल्हयातील महिला सरपंच यांचा देशाच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्यावर सन्मान होणे, ही चंद्रपुर जिल्हयासाठी अभिमानाची बाब आहे. याच पावलावर पाऊल ठेवून इतरांनी प्रेरणा घ्यावी व गावाचा विकास साधावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी
विवेक जॉन्सन यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->