- तब्बल १ महिन्यानंतर घटना आली उघडकीस
आष्टी - गडचिरोली, चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे ३९ वर्षीय इसमाने आठ वर्षाच्या चिमुकलीवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना तब्बल एक महिन्यानंतर उघडकीस आली आहे.
ईबाकार दौलत मडावी (३९) रा. कोनसरी ता. चामोर्शी असे आरोपीचे नाव आहे. सदर आरोपी हा घरी एकटाच राहत असुन पत्नी व मुले आलापल्ली येथे राहत असल्याची महिती आहे.
Ashti - The shocking incident of 39-year-old Isma molesting an eight-year-old girl at Konsari in Gadchiroli, Chamorshi taluka has come to light after a month.
Eibakar Daulat Madavi (39) Res. Konsari T. The name of the accused is Chamorshi. It is said that the said accused lives alone at home and his wife and children live at Alapally.
सविस्तर वृत्त असे की, आरोपी इबाकार दौलत मडावी याने जुलै महिन्यात घराशेजारील आठ वर्षीय पीडित मुलगी किराणा दुकानात संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास जात असताना आरोपीने खाऊच्या पैशाचे आमिष दाखवून स्वतःच्या घरात नेले व तिच्यावर अतिप्रसंग केला. त्यांनतर तिला या घटनेची माहिती दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे पीडित मुलीने हा प्रकार आई-वडिलांना सांगितला नाही. (प्रतिनिधी)
पंधरा दिवसांनंतर पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिच्या वर थातुर मातुर उपचार केल्यानंतर तिला घरी आणले. त्यांनतरही मुलीने सदर घटनेची वाच्यता केली नाहीं. परंतु पुन्हा आठ दिवसाने पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने खासगी रूग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिला इंजेक्शन देण्यासाठी काढल्यावर ती घाबरली व घडलेला अतिप्रसंगाचा प्रकार आई वडीलासमोर कथन केला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने घाबरलेल्या अवस्थेत दिनांक २४ ऑगस्ट रोजी आष्टी पोलिस ठाण्यात पीडित मुलिसोबत घडलेला प्रकार आष्टी पोलिस ठाण्यात कथन केला. त्यावरून अपराध क्रमांक २२२ /२०२३ नुसार गुन्हा दाखल करून सदर आरोपीस अटक केली.
हे देखील वाचा:
नोट: बातमी एक्सप्रेस पब्लिकेशन हाऊस बलात्कार किव्हा अन्य अत्याचार बातमी लेखनात अल्पवयीन मुलगी किव्हा महिलेचा नाव प्रकाशित करीत नाहीत.