धानोरा - तालुक्यात एकाच दिवशी २ युवकांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सदर घटना धानोरा पोलिस ठाण्याअंतर्गत २५ ऑगस्ट रोजी उघडीस आल्याने मोठी खळबळ परिसरात निर्माण झाली आहे.
Dhanora: An incident of 2 youths committed suicide by hanging themselves on the same day in Dhanora taluka. As the said incident came to light on August 25 under Dhanora Police Station, a lot of excitement has been created in the area.
1ली घटना:
गळफास घेऊन आत्महत्या करणार्या युवकाचे नाव : हिरामण कोल्लु दर्रो (३५) रा. मेंढा (लेखा) अस आहे. याने शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ,मृतक तुम येथील मूळ रहिवासी असून तो मेंढा (लेखा) येथे सरासरी बारा ते पंधरा वर्षा पूर्वी घरजावई म्हणुन गेला होता. हिरामण हा गेल्या काही वर्षापासून पत्नी पासून वेगळा राहत असल्याची माहिती मिळाली असून आत्महत्येपूर्वी तो बाहेर राज्यातील खाजगी कंपनीमध्ये ड्रायव्हिंग करण्यासाठी गेला होता. त्यानंतर आपल्या मूळ गाव दोन महिन्यापूर्वी तुकूम येथे वास्तव्यात आई- वडिलांकडेच राहत असताना 25 ऑगस्ट रोजी सकाळी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याला पत्नी व एक मुलगी आहे.
हे देखील वाचा:
2री घटना:
धानोरा येथील इंदीरा नगरातील रवींद्र कोटरंगे (३५) याने दारूच्या नशेत स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 25 ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. या युवकाची पत्नी सुद्धा दोन ते तीन महिन्यापूर्वी आपल्या मुलांना घेऊन माहेरी निघून गेल्याची ही माहिती मिळाली आहे. अधिक तपास धानोरा पोलिस करीत आहेत.