भंडारा : जिल्ह्यात गेल्या ३ दिवसांपासून विविध भागात नदी, नाले दुथडी भरून वाहत असून पावसाची संततधार सुरू आहे. अशातच आज पवनी तालुक्यातील चीचाळ गावात शेतात भातलावणी सुरु असताना वीज कोसळून 19 महिला आणि 6 पुरुष असे एकूण 25 जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.
या सर्व महिलांवर अड्याळ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्व शेतमजूर महिला असल्याची प्राथमिक माहिती कळते आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे राज्यात अनेका ठिकाणी दुर्देवी घटना समोर येत आहेत. भंडारा जिल्ह्यातही दोन विज पडल्याच्या घटना समोर आल्या असून यामध्ये 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे. पाऊस सुरु झाल्याने सध्या शेतीचे हंगाम सुरू आहे. अशातच विज पडल्याच्या दोन दुर्देवी घटना समोर आल्या आहे. काल सायंकाळच्या सुमारास शेतावर काम करत असताना साकोली व पवनी तालुक्यात वीज कोसळण्याच्या घटना घडल्या. यामध्ये साकोली येथे दोन मजूर जखमी झाले असून त्यांचे उपचार साकोली येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू आहे.
तर दुसरी घटना पवनी तालुक्यातील चिचाळ येथे घडली असून शेतात रोवणी करत असताना अचानक वीज पडली. यामध्ये २० महिला जखमी झाल्या आहेत. या महिला बचावल्याने मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेतील जखमी महिलांवर जवळच्या अड्याळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असून डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करते आहे. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार सर्व महिलांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
- छाया रुपचंद बिलवणे वय ३४ वर्षे रा. चिचाळ
- कविता विनोद मोहरकर वय ३२
- अनिल आनंदराव काटेखाये वय ४२
- रुपचंद विठ्ठल बिलवणे वय २५
- विजय भाकर मोहकर ५० वर्षे
- रुखमा रामचंद्र विलवणे वय ५५ वर्षे
- संगिता विनोद नखाते वय ३५ वर्षे
- देवचंद बालकण बिलवणे वय ४० वर्षे
- ज्ञानेश्वर गोपिनाथ बिलवणे वय ५५ वर्षे
- प्रमिला अमिल काटेखाये वय ३२ वर्षे
- दिपमाला झालेश्वर सिलवणे वय – ४५ वर्षे
- शालु केशव भुरे वय -४८ वर्षे
- लालचंद बिलवणे वय २८ वर्षे
- रज्जु लुकाराम मोहरकर वय ३०
- सुष्मा परमेश्वर बिलवणे वय ३८ वर्ष
- सुनिता राजीव मोहरकर वय- ३० वर्षे
- सुनिता देवचंद बिलवणे वय – ३८ वर्षे
- जोत्सना विजय मोहरकर वय ३०
- प्रियंका विकास बिलवणे वय – ३५ वर्षे
- राणी कैलास काटेखाये वय ३१ वर्षे
- विक्की योगीराज बिलवणे वय २६
असे जखमींची नावे आहेत.