गडचिरोली: वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू | Batmi Express

Be
0

Aheri,Gadchiroli Lighting,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli Lighting Strike,Gadchiroli Batmya,

गडचिरोली दि,२६ जुलै :
अहेरी तालुक्यातील महागाव (बु )येथील सकाळी शेतीच्या कामाकरीता गेलेल्या शेतकऱ्यावर वीज पडुन जागीच मृत्यू झाल्याची सकाळी 8.30 ते 9:00 वाजताच्या दरम्यान घटना घडली आहे. लक्ष्मण नानाजी रामटेके वय 54 रा. महागाव असे मृत्यू शेतकऱ्याचे नाव आहे.

काल संध्याकाळपासूनच अहेरी परिसरात ढगाळ हवामान असल्याने पावसाची दाट शक्यता होती. आज सकाळीच अचानक वातावरणात बदल होऊन पाऊस सुरू झाला. तालुक्यातील अहेरी, महागाव, चेरपल्ली, वांगेपल्ली, नागेपल्ली, आलापल्ली, पुसुकपल्ली आदी गावामध्ये मुसळधार पाऊसाने हजेरी लावली.

काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. महागाव बू येथेही पावसाची सुरवात होताच शेतीचे काम करण्यासाठी बांधावर गेले होते. याचवेळी त्यांच्या अंगावर वीज पडून ते जमिनीवर कोसळले. घटनेची माहिती मिळताच गावकरी तसेच कुटुंबीयांनी शेत बांधावर धाव घेतले.

त्यांच्या पश्चात दोन पत्नी, दोन मुली, जावई व नातू असा आप्त असुन घरचा कर्ता व्यक्तीचा मृत्यू झाल्याने रामटेके परिवारावर डोंगर कोसळले असुन महागाव बू परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. रामटेके यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावे म्हणुन अशी मागणी गावकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->