चंद्रपूर(दि.25 जुलै) :- आदिवासी बहुल भाग असलेल्या जिवती तालुक्यातील आबेझरी गावातील १९ वर्षीय आदिवासी मतीमंद मुलींवर अतिप्रसंग करण्यात आला. सदर नराधमाचे नाव शपरूद्दिन शेख (वय ४५) असून अंबेझरी येथिल रहिवासी आहे. पिडीताचे आई- वडील शेतात गेल्याची संधी साधून नराधमाने १९ वर्षीय मुलगी एकटी असल्याची पाहून नराधमाने घरात घुसून त्या मुलींचे हातपाय बांधून तिच्यावर अतिप्रसंग केला आहे.
सदर आरोपीवर भादवी कलम अपराध कं व कलम १५ / २३, कलम ३७६ (१), ३७६ (२) (जे), ३७६ (२) (एल), ४५० भादवि सहकलम 3(1)(W)(i)(ii), 3 (2) (va) अनुसुचित जाती जमाती अत्याचार संरक्षण अधिनियम गुन्हाची नोंद केली असून आरोपीला अटक करण्यात आले आहे.
आदिवासी समाजावर दिवसेंदिवस अत्याचारात वाढ होत आहे. १९ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग केला आहे त्या आरोपीवर तात्काळ सखोल चौकशी करून कठोर कार्यवाही करण्यात यावी. असा तीव्र संताप समाजामध्ये व्यक्त केला जात आहे.
नोट: बातमी एक्सप्रेस पब्लिकेशन हाऊस बलात्कार किव्हा अन्य अत्याचार बातमी लेखनात अल्पवयीन मुलगी किव्हा महिलेचा नाव प्रकाशित करीत नाहीत.