ब्रम्हपुरी : राज्यातील काही जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊ पडत आहे. त्यातील एक जिल्हा म्हणजे चंद्रपूर. चंद्रपूर जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील लाडज गावाचा अन्य गावांशी आता संपर्क तुटला आहे. नदीला पूर असल्यानं विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ पाण्यातून जीवघेणा प्रवास करत आहेत.
मुसळधार पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. नद्यांना पूर आल्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. नदीला पूर असल्यानं विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ पाण्यातून जीवघेणा प्रवास करत आहेत. सध्या नाव बंद असल्याने पाण्यातून जीवघेणा प्रवास करत आहेत.
मात्र, प्रशासनाकडून अद्याप कुठलीही सुविधा किंवा त्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या गावाच्या चारही बाजूने वैनगंगा नदीचा वेढा आहे. एकीकडे देशात सर्वत्र देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत असताना मागील 75 वर्षापासून या गावाला जोडण्यासाठी नदीवर पुल बांधण्यात आलं नसल्यानं हे ग्रामस्थ या नदीतूनच जीवघेणा प्रवास करीत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. पावसाळ्यात तर या गावाचा अन्य गावांसह तालुका आणि जिल्ह्याची संपर्क तुटतो किं बहुना कुठल्या विशेष गरजा पूर्ण करायच्या असल्यास त्यांना छोट्या नावेतूनच दुथडी भरून वाहणाऱ्या नदीपात्रातूनच प्रवास करुन पूर्ण कराव्या लागत आहेत. मागील २ वर्षांपूर्वी नावेतून प्रवास करताना एक नाव नदी पात्रात मधोमध पोहोचल्यानंतर अचानक नियंत्रण तुटल्याने नाव बुडाली होती. या घटनेत काही बचावले तर काहींना आपलं प्राण गमवावं लागलं होत.