तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

धारदार शस्राने हल्ला करून २० वर्षीय युवतीची निर्घृण हत्या | Batmi Express

Gadchiroli,Crime,Sironcha,Gadchiroli Murdered,Gadchiroli Crime,

Gadchiroli,Crime,Sironcha,Gadchiroli Murdered,Gadchiroli Crime,

सिरोंचा :
 सिरोंचा तालुक्यातील रंगयापल्ली येथे रात्री झोपेतच एका २० वर्षीय तरुणीचा गळ्यावर धारदार शस्राने वार करून खून करण्यात आला. विशेष म्हणजे घरात सदर युवतीचा भाऊ आाणि आई झोपलेले असताना त्यांना या खुनाचा थांगपत्ता लागला नाही. सकाळी उठल्यानंतरच ही घटना उघडकीस आली. त्यामुळे हा रहस्यमय खून कोणी आणि कशासाठी केला याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.

ओलिता रामय्या सोयाम (२० वर्ष) असे मृत युवतीचे नाव आहे. गुरुवारच्या रात्री नेहमीप्रमाणे ती घरातील खोलीत झोपलेली होती. यावेळी तिचा भाऊ बुचया रामया सोयाम (२८ वर्ष) हा घराच्या आवारातच झोपलेला होता. तसेच आईसुद्धा दुसऱ्या खोलीत झाेपलेली होती. शुक्रवारी सकाळी भाऊ बुचया झाेपेतून उठल्यानंतर अंथरून घरात नेऊन ठेवण्यासाठी गेला असता त्याची बहिण खाटेवर निपचित पडलेली दिसली. तिच्या खाटेखाली रक्त सांडलेले होते आणि मागचा दरवाजा उघडा होता. त्याने ओलिताला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला पण ती मरण पावली होती. घाबरून त्याने आरडाओरड करत आईला उठविले. तसेच गावात असलेला मामाचा मुलगा सुधाकर आत्राम यालाही बोलवून आणले. दोघांनी बारकाईने पाहिले असता ओलिताच्या हनुवटीच्या खाली गळ्यावर, मानेवर धारदार शस्राने वार केलेला दिसला.

हा खून घरातच झाला असेल तर ओलिताच्या ओरडण्याचा आवाजही कोणाला कसा आला नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. याप्रकरणी शुक्रवारी दुपारी सिरोंचा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शितल धविले करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.