Gondwana University: विद्यार्थ्यांना शून्य ते पाच गुण कस काय? गोंडवाना विद्यापीठाचा प्रताप; विद्यार्थ्यांचा संताप | Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gondwana University,Gadchiroli News IN Marathi,Marathi Batmya,Gadchiroli Batmya,Marat

Gondwana University Summer Exam 2023 Date,Gondwana University Summer Exam 2023,Gondwana University Summer Exam,Gadchiroli News,Gadchiroli  Live News,

गडचिरोली:- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत महाविद्यालयांती अनेक सेमिस्टरचा निकाल जाहीर करण्यात येत आहे. या परीक्षेतील अनेक पेपरमध्ये काही विद्यार्थ्यांना शून्य ते पाच गुण मिळाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या उन्हाळी परीक्षा मे महिन्यात घेण्यात आल्या. या परीक्षांचे निकाल जाहीर झाले. निकालामध्ये अनेक विद्यार्थ्यांना शून्य ते पाच गुण मिळाले. महाविद्यालयातर्फे पाठविण्यात आलेले अंतर्गत गुण हे गुणपत्रिकेवर अचूक आले. मात्र, लेखी परीक्षेतील ८० गुणांपैकी अनेक विद्यार्थ्यांना इंग्रजी, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मराठी, झूलॉजी, केमिस्ट्री व इतर विषयामध्ये शून्य, एक, दोन, तीन, पाच असे गुण देण्यात आले असे चुकीचे गुण देऊन शक्य करून दाखविले. शून्य गुणदान पद्धतीने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून त्यांना पुनर्परीक्षा द्यावी लागणार आहे.एवढेच नाहीतर मिलीटरी सायन्स, समाजशास्त्र विषयात ४२ आणि ४५ गुण असून सुद्धा निकाल नापास म्हणून देण्यात आला.  महाविद्यालयाने या संदर्भात तातडीने विद्यापीठाला कळवावे. याप्रकाराने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. महाविद्यालय आणि विद्यापीठाने याची चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी केली जात आहे.

अनेक सेमिस्टरच्या परिक्षेत काही विद्यार्थ्यांना शून्य ते पाच गुण मिळाल्याची बाब समोर आली. या संदर्भात काही विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयांनी फोनद्वारे तक्रारही केली आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यात येईल.
डॉ. देवेंद्र झाडे परीक्षा नियंत्रक
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली

काय लिहिले आहेत निवेदनात?

गोंडवाना विद्यापीठातील सर्व शाखेतील पदवीच्या सेमिस्टर चा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये विद्यापीठाच्या थेरी व प्रैक्टिकल विषयांमध्ये गुण देतांना शून्य ते पाच असे गुण देण्यात आले. जे शक्य नाही. यात केवळ एक विद्यार्थीच नसून शेकडो विद्यार्थ्यांना विद्यापीठाद्वारे चुकीचे गुण देण्यात आले. दरवर्षी हा त्रास बऱ्याच गरीब विद्यार्थ्यांना भोगावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकनाचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. विद्यार्थी विद्यापीठाच्या या चुकीच्या गुण धोरणामुळे शिक्षण सोडतो व वंचित राहतो असे निदर्शनास आले आहे. या सर्व बाबीला विद्यापीठाचा परीक्षा मूल्यांकन विभाग जबाबदार आहे. वरील सर्व प्रकार गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे करिता या सर्व प्रकारची विभागीय चौकशी करण्यात यावी ही आपणास नम विनंती.

मानव अधिकार संरक्षण मंच व नेचर फाउंडेशन नागपूर चे सचिव निलेश ननावरे यांनी कुलसचिव गोंडवाना विद्यापीठ मार्फत राज्यपाल, मुख्यमंत्री, तंत्र व उच्च शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य यांना या सर्व प्रकरणाची तातडीने विभागीय चौकशी करण्यात यावी या करिता निवेदन दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.