गडचिरोली: मुसळधार पाऊसामुळे उद्या जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय बंद | Batmi Express

Gadchiroli Rain,Gadchiroli Rain 2023,Gadchiroli,Gadchiroli Red Alert,

Gadchiroli Rain,Gadchiroli Rain 2023,Gadchiroli,Gadchiroli Red  Alert,

गडचिरोली, २० जुलै :
 जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाने व हवामान विभागाने दिलेल्या अलर्ट नुसार जिल्ह्यातील सर्व शाळा, विद्यालये, महाविद्यालयांना उद्या २० जुलै रोजी प्रशासनाच्या वतीने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले आहे. (Gadchiroli Red  Alert )

जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊसासह अतिवृष्टी झाल्याने वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता, वांडिया, पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती नद्यांच्या पाण्याची पातळीसुद्धा वाढत असून सदर पाणलोट क्षेत्रातील नद्या व नाल्यांना पूर आल्याने जिल्हयातील अंतर्गत मार्ग बंद होत असतात. तसेच भारतीय हवामान विभागाचे प्रादेशिक कार्यालय, नागपूर द्वारा आज १९ जुलै रोजी प्रसारित हवामान संदेशानुसार गडचिरोली जिल्ह्याला अलर्ट देण्यात आलेले असून वज्राघातासह मुसळधार ते अत्यंत मुसळधार पाऊसाची दाट शक्यता वर्तविली आहे त्यामुळे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली संजय मीणा यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत पूरपरिस्थितीवर उचित प्रतिबंधात्मक उपाययोजनेतंर्गत उद्या २० जुलै रोजी गडचिरोली जिल्हा सीमाक्षेत्रामधील सर्व शाळा, विद्यालये, अंगणवाडी, महाविद्यालये सदर कालावधीत बंद असतील तसेच सदरचे आदेश केवळ शाळा, विद्यालये, महाविद्यालये करिता लागू असून इतर सर्व कार्यालये, आस्थापना, दुकाने इत्यादींना सदरचे आदेश लागू नाही असे कळविले आहे.
आदेशाचे पालन न करणारी / उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.