Android Alert News: तुमच्या मोबाईल वर असा SMS आला असेल तर घाबरून जाऊ नका | Batmi Express

India,India News,India Today,News India,Tech,Android Alert,

India,India News,India Today,News India,Tech,Android Alert,

देशभरात अनेक मोबाईल वापरकर्त्यांना भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या वतीने एक अलर्ट आला. नागरिकांच्या फोनवर अचानक एक अलार्म वाजण्यास सुरुवात झाली. तसेच मोबाईलवर हा संदेश भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून आपतकालीन अलर्ट सेवेचे चाचणी घेण्याचा असल्याचं सांगण्यात आलं.. (Android Alert News)

विशेष म्हणजे अशाप्रकारच्या आपतकालीन संदेश सेवेच्या (पूर, भूकंप ,वैदकिय अपडेट)चाचणीचा अलर्ट देण्यात येणार असल्याबाबत सरकारकडून कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे या अलर्टबाबत नागरिक अनेक शक्यता व्यक्त करत आहेत. केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालय किंवा पीआयबीच्या ट्विटर हँडलवरही याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

नेमकं काय घडलं?
सकाळी दहा ते साडेदहाच्या सुमारास अनेक मोबाईलधारकांचा मोबाईल अचानक मोठ्या आवाजात वाजायला लागला. यानंतर मोबाईलच्या स्क्रिनवर एक संदेश आला. त्यात हा संदेश भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या आपतकालीन संदेश सेवेचा भाग असल्याचं सांगण्यात आलं. काही सेकंद मोठ्या आवाजात अलार्म वाजल्यानंतर तोच मेसेज व्हॉईस मेल स्वरुपात ऐकू आला.

आपतकालीन संदेशातील ओके बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला असे आपतकालीन अलर्ट हवे आहेत का असं विचारण्यात आलं. तसेच हो आणि नाही असे दोन पर्याय देण्यात आले. आधी हा अलर्ट इंग्रजीत आला आणि त्यानंतर मराठीत आला.

विशेष म्हणजे सर्व अँड्रॉईड मोबाईलवर हा संदेश आला असला, तरी अॅपल आयफोनवर असा कोणताही अलर्ट आलेला नाही.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.