Gadchiroli Flood 2022: गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ (Photo Use Only News Purpose) |
गडचिरोली : सध्या मान्सून कालावधी सुरु असून मागील 5 दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात मुसळधार तर अति मुसळधार पाऊसामुळे अतिवृष्टी झालेली आहे. गोदावरी, प्राणहिता, बांडिया, पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती इ. नद्यांच्या पाण्याची पातळी ही वाढत असून सदर पाणलोट क्षेत्रातील नद्या व नाल्यांना पूर आल्याने बरेच अंतर्गत मार्ग बंद आहे.
तसेच भारतीय हवामान विभागाचे प्रादेशिक कार्यालय, नागपूर व हैद्राबाद द्वारा २७ जुलै २०२३ द्वारे प्रसारित हवामान संदेशानुसार पुढील २४ तासाकरीता गडचिरेाली/चंद्रपूर जिल्हा व गडचिरोली जिल्ह्यातील प्राणहिता, गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रातील तेलंगाणा राज्यातील काही जिल्हृयांना रेट अलर्ट घोषित करुन मुसळधार पाऊसासह अत्याधिक पाऊसाची दाट शक्यता वर्तविली आहे. पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकरीता जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली, संजय मीणा, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत पूरपरिस्थितीवर उचित प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील २८ जुलै २०२३ व २९ जुलै २०२३ रोजी सर्व अंगणवाडी, शाळा, विद्यालये, महाविद्यालये बंद करण्याचे आदेश देत आहे.
सदरील आदेशाचे पालन न करणारी/ उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली यांनी कळविले आहे.