तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

चंद्रपूर: रेती तस्करी करणाऱ्या हायवा ट्रक वर कडक कारवाई | Batmi Express

Chandrapur,Chandrapur  News,Chandrapur Live,Chandrapur Today,

चंद्रपूर (Chandrapur) :
 आज ०३ जुन २०२३ रोजी सकाळी ४:१५ वा दरम्याम सपोनि राजकीरण मडावी, नेमणूक पोलीस स्टेशन पडोली हे पो स्टाफ चपोना/शहाजी खांडरे, पोलीस शिपाई/किशोर वाकाटे यांचेसह पोलीस स्टेशन पडोली हद्दीमध्ये गुडमॉर्निंग पेट्रोलिंग करीत असताना यातील आरोपी ट्रकचालक १) अविनाश नारायण ठाकूरीया (३८), जात-कोल, रा. अष्ठभुजा, रमाबाई नगर, चंद्रपूर २) सरफराज खान भुरेखान पठाण (४२), जान-मुस्लीम, रा. बाबुपठ, नेताजी चौक, चंद्रपूर असे पडोली ते घुग्गुस रोडने ट्रक क्र. MH३४ BG५८६३ व ट्रक क्र. MH३४ BG५८६४

यामध्ये रेतीची वाहतूक करीत असताना दिसल्याने नमूद ट्रकमध्ये अवैधरित ९ रेतीची वाहतूक होत असल्याचा संशय आल्याने सपोनि मडावी यांज पोलीस स्टाफसह दोन्ही ट्रकचा पाठलाग करून ट्रक थांबविला व ट्रक चालकास विचारपूस केली असता ते दोन्ही ट्रक चालकांनी आरोपी क्र. ३) अश्वीन उर्फ गुड्डू ठाकूर (३७), रा. सरकार नगर, चंद्रपूर याचे सांगणेवरून विना परवाना रेतीची वाहतूक करीत असल्याचे सांगितले. यावरून नमूद आरोपी हे गौनखनिज रेतीची चोरी करून वाहतूक करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने १) रेतीने भरलेला ट्रक क्र. MH३४ BG५८६३ किंमत रु. १५ लाख त्यामध्ये रेती रु. २० हजार २) रेतीने भरलेला ट्रक क्र. MH३४ BG५८६४ किंमत रु. १५ लाख त्यामध्ये रेती रु. २० हजार असा एकूण रु. ३० लाख ४० हजार चा मुद्देमाल जप्त करून ठाणेदार पोलीस निरीक्षक सुनील पवार यांचे मार्गदर्शनाखाली तिन्ही आरोपीविरुद्ध कलम ३७९, १०९, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून आरोपी क्र १ व २ यांना अटक करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.