सिंदेवाही: अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रक्टरच्या अपघातात इसमाचा मृत्यू | Batmi Express

Be
0

Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Today,Chandrapur  News,Sindewahi,

सिंदेवाही (Sindevahi) :
 सिंदेवाही तालुक्यातील जंगलव्याप्त परीसरात उमा नदी (Uma River) वर मोठ्या प्रमाणात रेतीची अवैद्य वाहतुक सुरू आहे. रोज रात्रोला रेती तस्कर हे मोठ्या प्रमाणात रेती चोरी करून विकण्याचा गोरखधंदा करीत आहेत. पण या धंद्याला संबधीत महसुल विभागाकडुन दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येते आहे. या अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रक्टरने रत्नापूर येथील रहवासी मनोहर रुषी पात्रे यांचा अपघात झाल्याने त्याला ग्रामीण रुग्नालय सिंदेवाही येथे नेले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. ही घटना रात्रो अंदाजे ४:०० वाजता पहाटेच्या सुमारास घडली.

सविस्तर वृत असे की, मयत मनोहर रूषी पात्रे यांना बांधकामासाठी रेती लागत असल्याने रेती विकणारे यांचेशी संपर्क साधुन रेती एक ट्राली सांगितली. रेती विकणारे यांनी पात्रेयांचेकडे पाहाटे ४:०० वाजता MH ३४ L ९६१९ या क्रमांकाचे ट्रक्टरने रेती आणली रेती खाली टाकण्यासाठी ट्रक्टर मागे घेत असताना मनोहर पात्रे यांना ट्रक्टरची धडक बसली आणि त्यात गंभीर जखमी झालेत त्यांना त्वरीत रुग्नालयात नेण्यात आले, पंरतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे सदर घटना पहाटे ४:०० वाजता घडली. गावातील पोलीस पाटील नरेंद्र गहाणे यांनी संबधीत पोलीस प्रशासनाला माहीती दिली. पोलीसानी घटना स्थळी दाखल होवून ट्रक्टर ताब्यात घेतला आहे. ट्रक्टरच्या चालकावर गुन्हा दाखल केला आहे. रात्री चालणाऱ्या रेती तस्करी मुळे यापूर्वी ही अनेक घटना घडल्या आहेत. शासनाचा मोठ्या प्रमाणात महसुल डुबत असतांना सुद्धा संबधीत विभाग गप्प का? असा सवाल जनतेत विचारला जात असुन या घटनेत नाहक बळी गेल्याचे गावकरी जनतेत बोलल्या जात असुन पात्रे यांचे या आकस्मिक मृत्युने हळहळ व्यक्त होत आहे.

आता तरी प्रशासन जागे होऊन यावर आळा बसेल का ? असाही प्रश्न गावकरी जनता उपस्थीत करीत असुन, आता यावर कोणती कारवाई केली जाते. याकडे संबध गावकरी जनतेचे लक्ष लागलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->