चंद्रपूर: चारित्र्यावर संशय अन...पतीने केली पत्नीची कुऱ्हाडीने हत्या | Batmi Express

Pombhurna,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Crime,Chandrapur Murder,Chandrapur Murdered,Chandrapur Crime News,

Pombhurna,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Crime,Chandrapur  Murder,Chandrapur   Murdered,Chandrapur Crime News,

पोंभुर्णा:-
 पोंभूर्णा तालुक्यातील पोलीस स्टेशन उमरी पोतदार हद्दीतील डोंगर हळदी(माल) येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची कुऱ्हाडीने हत्या केल्याची घटना दि. ०६ जून पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून दोन मुली गंभीर जखमी झाले आहेत.

मृतक पत्नीचे नाव आशा मनोज लेनगुरे वय (३८) वर्ष तर जखमी मुलींमध्ये अंजली मनोज लेनगुरे वय (१७) वर्ष,पुनम मनोज लेनगुरे वय(१२) वर्ष असे आहे. दोन्ही मुलींवर चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. आरोपी यांच्यावर भादवी कलम ३०२, ३०७, ३२४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पती मनोज लेनगुरे (वय ४०) याला पोलिसांनी अटक केली आहे.  पुढील घटनेचा तपास उमरी पोतदार पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेरकी करीत आहेत.

सविस्तर वृत्त काही वेळातच.....

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.