वन विभागातील लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट ब) (अराजपत्रित), लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट ब) (अराजपत्रित), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब) (अराजपत्रित), वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट-क), कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट-क), लेखापाल (गट-क), सर्व्हेक्षक (गट- क) व वनरक्षक पदाची जाहिरात ८ जून २०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर पदाकरीता अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० जून २०२३ अशी होती. दरम्यान उमेदवारांना अर्ज करण्याची पुरेशी संधी उपलब्ध व्हावी याकरीता अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही ३ जुलै २०२३ पर्यंत वाढविण्यात येत आली आहे, असे डॉ. कुमारस्वामी एस.आर. उपवनसंरक्षक (मानव संसाधन व्यवस्थापन), नागपूर यांनी पत्राद्वारे कळविले आहे.अर्ज करण्यास मुदतवाढ करण्यात आली असली तरी वयोमर्यादा / शैक्षणिक अर्हता धारण करण्याचा दिनांक हा ३० जुन २०२३ असाच राहील असेही सूचित केले आहे. सदर जाहिर सुचना या मा. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे मान्यतेने निर्गमित करण्यात आली आहे.
आवश्यक कागदपत्रे:
- Aadhar Card
- 10th 12th Marksheet (SSC / HSC Marksheet)
- Graduation Marksheet (Degree in any discipline)
- Domicile Certificate
- Non Creamy Layer Certificate
- Caste Certificate
- Passport size photo
- Signature
- Email ID
- Mobile Number
- EWS प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसार)
- महिला आरक्षण प्रमाणपत्र (फक्त महिलांना लागू असल्यास)