Maharashtra SSC Result 2023: : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10वीचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलं. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी 1 वाजल्यापासून निकाल उपलब्ध होतील. राज्याचा एकूण निकाल 93.83 टक्के लागला आहे. सर्वाधिक निकाल कोकण मंडळाचा 98.11 टक्के तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 92.5 टक्के लागला आहे. दरम्यान गेल्यावर्षी 10 वीचा निकाल 96.94 टक्के इतका होता यंदा मात्र तोच निकाल 93.83 टक्के इतका लागला आहे. म्हणजे 3 टक्के कमी झाला आहे. बारावीच्या निकालाप्रमाणेच दहावीच्याही निकालाचा टक्का यंदा घटला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी सर्वोत्तम बाजी मारली आहे. यावर्षी 95.87 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 92.05 टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 3.5 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10वीची परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. विभागनिहाय निकालाची टक्केवारी पाहता कोकण विभाग अव्वल स्थानी असून मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला आहे.राज्याचा एकूण निकाल 93.83 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 98.11 टक्के लागला असून नागपूर विभागाचा 92.5 टक्के लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत निकाल जाहीर केला आहे.
विद्यार्थ्यांची आकडेवारी:
- एकूण परीक्षेला बसले विद्यार्थी :15,77,256
- एकूण परीक्षेला बसले मुले: 8,44,116
- एकूण परीक्षेला बसले मुली: 7,33,067
- निकालाची टक्केवारी : 93.83 टक्के
- मुलींचा निकाल: 95.87 टक्के
- मुलांचा निकाल: 92.05 टक्के
विभागानुसार निकाल:
- राज्याचा एकूण निकाल : 93.83 टक्के
- कोकण : 98.11 टक्के
- पुणे : 95.64 टक्के
- मुंबई : 93.66 टक्के
- कोल्हापूर : 96.73 टक्के
- औरंगाबाद : 93.23 टक्के
- अमरावती : 93.22 टक्के
- लातूर : 92.67 टक्के
- नाशिक : 92.22 टक्के
- नागपूर : 92.05 टक्के
- मुलींचा निकाल: 95.87 टक्के
- मुलांचा निकाल: 92.05 टक्के