चंद्रपूर: ब्रम्हपुरी जिल्हा निर्मितीसाठी चक्काजाम व धडकला उपविभागीय कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा | Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Sand Smuggling,Bramhapuri,Bramhapuri Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Bramhapuri News,

Chandrapur News,Chandrapur,Sand Smuggling,Bramhapuri,Bramhapuri Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Bramhapuri News,

ब्रह्मपुरी
: दिनांक,०२/०६/२३ विविध पक्ष व सामाजिक संघटना व ग्रामपंचायतीने दर्शविला  ब्रह्मपुरी जिल्हा संघर्ष समितीला प्रत्यक्षरीत्या पाठिंबा आणि त्यांच्यामुळेच आज ब्रह्मपुरी जिल्हा झालाच पाहिजे या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन व धडक मोर्चा यशस्वीरीत्या पार पडला.

ब्रह्मपुरी जिल्हा व्हावा  या मागणीला घेऊन ब्रह्मपुरी तालुका संघर्ष समितीच्या वतीने आज  ब्रह्मपुरी येथील अशोक सम्राट चौकातून सकाळी ९ वाजता मोर्चाला सुरुवात करण्यात आली. या मोर्चाला विविध पक्ष, सामाजिक संघटनांनी प्रत्यक्षरीत्या पाठिंबा देऊन ब्रह्मपुरी तालुक्यातील शेकडो नाकरीक मोर्चात सहभागी झाले होते.
शासनाने नवीन २२ जिल्हे बनवण्याच्या हालचाली सुरू करताच ब्रम्हपुरी जिल्हा बनविण्याच्या दृष्टीने सन १९८२ पासुनच पूर्णत: निकषामध्ये बसला आहे. फक्त राजकीय प्रभावाने त्यावेळी ब्रम्हपुरी जिल्हा न होता गडचिरोली जिल्हा घोषीत  केला गेला. तेव्हापासून ब्रम्हपुरी जिल्ह्यासाठी सातत्याने मागणी होत होती. ब्रह्मपुरी शहर हे भौगोलिक,सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक,आरोग्य नगरी म्हणून विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रभर या शहराचा नावलौकिक  प्रसिद्ध आहे  ऐतिहासिक,भौगोलिक, शैक्षणिक शहर,आरोग्य नगरी.व सर्व सोयीसुविधांनी समाविष्ट असणारा हा तालुका आहे.
 त्यामुळे यापुढे ब्रम्हपुरीच जिल्हा झालाच पाहिजे यासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात आला.  मागील ४० वर्षापूर्वी सन १९८२ पासून येथील जनतेची जिल्हा निर्मितीची मागणी आहे. ब्रम्हपुरी जिल्हा व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. ब्रम्हपुरी चंद्रपूर जिल्ह्याची जुनी तहसिल आहे. पूर्वीपासून जिल्ह्यात चंद्रपूर नंतर ब्रम्हपुरीचा दुसरा क्रमांक लागतो याप्रकारच्या सोयी सुविधाही ब्रह्मपुरी शहरात उपलब्ध आहेत. भौगोलिक दृष्टीने हा तालुका परिपक्व आहे. महसुलची जागा ब्रम्हपुरी शहराच्या सभोवताल आहे. जिल्ह्यासाठी लागणाऱ्या शासकीय इमारती सुसज्ज आहेत. इतर तालुक्यांपेक्षा या तालुक्याला जिल्हा घोषीत केल्यास अगदी कमी खर्च लागणार असल्याने शासनाने ही बाब अधोरेखीत केली आहे.  
यापूर्वी ब्रम्हपुरी जिल्ह्यासाठी सातत्याने अनेक आंदोलने झाली आहेत. जिल्ह्यासाठी कोर्ट, कचेऱ्या नागरीकांनी पाहील्या आहेत व ब्रम्हपुरी जिल्हा तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुध्दा प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे . तद्वतच ग्रामपंचायत आणि विविध संघटनेच्या माध्यमातून या अगोदर शासनाला पाठविण्यात आले आहेत. ब्रम्हपुरी हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील एक अतीमहत्वाचे शहर आहे. मधल्या काळात चिमूर जिल्हा निर्मितीची मागणी करण्यात आली होती. मात्र चिमूर हे ठिकाण फार लांब टप्प्यात येत असल्याने येथे विविध कामकाजासाठी जाण्याकरीता कमालीचा त्रास सहन करावा लागेल. शिवाय या उलट ब्रम्हपुरी हे शहर मुख्य राष्ट्रीय महामार्गावर असल्याने सर्वांसाठी सोयीचे होणार आहे. शिवाय रेल्वेची पण सुविधा उपलब्ध आहे. ब्रम्हपुरी येथे नव्याने १०० खाटांचे ग्रामीण रुग्णालय, नगर परिषदेची नवीन इमारत, टोलेजंग प्रशासकीय इमारत, न्यायालयाची प्रशस्त इमारत आदी इमारतींचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. बस आगार, दक्षिण- पूर्व-मध्य रेल्वे सुविधा आहे, 
औद्योगिक, शैक्षणिक व वैद्यकीय सेवा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. व इतर शासकीय उद्योग प्रकल्प उभारण्यासाठी ब्रम्हपुरी परिसरात जवळजवळ ५०० एकर शासकीय जमिन उपलब्ध आहे. त्यामुळे आजुबाजुच्या परिसरातील जनतेला शासकीय व इतर कोणत्याही कामकाजाकरीता सोयीचे आहे. ब्रम्हपुरी तालुका हा चंद्रपूर,गडचिरोली जिल्हा एक असतांनाच सर्वात जुना तालुका आहे. नागभीड,सिंदेवाही हे सध्याचे तालुकेही त्यावेळेस ब्रम्हपुरी तालुक्यात समाविष्ट होते.
 न्यायालय, तहसिल कार्यालय, उपविभागीय महसूल अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी ही सर्व कार्यालये त्यावेळेपासून ब्रम्हपुरीत अस्तित्वात आहेत. ब्रम्हपुरी पासून वडसा, कुरखेडा, आरमोरी, नागभीड, कोरची, सिंदेवाही या तालुक्यांची गावे अवघ्या ५० किलोमीटर अंतराच्या आत येत असून चारही बाजुने दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध आहेत. एक जिल्हा होण्याकरीता लागणारे सर्व शासकीय निकष ब्रम्हपुरीच्याच बाजुने आहेत आणि ही गोष्ट कोणीही नाकारु शकत नाही. तरीही जेव्हा जिल्हा निर्मितीचा मुद्दा ऐरणीवर येतो तेव्हा ब्रम्हपुरीकरांवर अन्यायच होत आहे. त्यामुळे आता ब्रम्हपुरीकरांनी जिल्हा निर्मिती होण्या करीता ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्या वतीने कंबर कसली.
 ब्रह्मपुरी जिल्हा झालाच पाहिजे ही क्रांतीची मशाल घेऊन  आज सकाळी ९.०० आक्रोश मोर्चा काढून उपविभागीय कार्यालयावर धडकला. यावेळी एसडिओ संदीप भस्के यांना निवेदन देण्यात आले. व त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री .उपमुख्यमंत्री यांना निवेदन पाठवण्यात येणार आहे.
तत्पूर्वी स्थानिक ख्रिस्तानंदचौकात चक्काजाम आंदोलन करीत ब्रम्हपुरीकर रस्त्यावर उतरले . व ब्रह्मपुरी  जिल्हा घेतल्याशिवाय ब्रह्मपुरीकर स्वस्त बसणार नाही अशा घोषणा आंदोलनक यावेळी आक्रोश मोर्चातून असा इशारा देत होते.यावेळी मोर्चात सहभागी मा.आमदार प्राध्या. अतुल देशकर.यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. यांची भेट घेऊन प्रत्यक्ष ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी रेटून धरली जाणार असल्याचे सांगितले. यावेळी ब्रह्मपुरी च्या नगराध्यक्ष रीता उराडे. यांच्यासह जवळपास प्रत्येक पक्षातील राजकीय नेते. ज्येष्ठ नागरिक, विविध संघटनेतील कार्यकर्ते.जवळपास प्रत्येकच ग्रामपंचायत मधील पदाधिकारी व तालुक्यातील आंदोलक युवा वर्ग व नागरिक शेकडोच्या संख्येने उपस्थित होते. 
त्यामुळे ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी अधिकच बळकट होईल असे मत जिल्हा संघर्ष समितीच्या निमंत्रक प्रशांत डांगे,विनोद झोडगे.सुरज शेंडे, अविनाश राऊत, सुधाकर पोपटे,  राजू भागवत, दीपक नवघडे, सुरज विखार, राहुल सोनटक्के सुनील विखार, सुरज मेश्राम, ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.