ब्रम्हपुरी: ड्युटी करताना बिअर पिणारे दोन पोलीस निलंबित | Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Bramhapuri Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Bramhapuri News,

Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Bramhapuri Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Bramhapuri News,

ब्रम्हपुरी
: पोलिस बंदोबस्तादरम्यान चक्क बीअर शॉपीमध्ये जाऊन दारू ढोसणाऱ्या दोन पोलिसांना जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी निलंबित केले आहे. त्यामुळे पोलिस विभागात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई असल्याचे बोलले जात आहे. उमेश मस्के, नरेश निमगडे अशी निलंबित झालेल्या दोन पोलिसांची नावे आहेत.

२ जून रोजी ब्रम्हपुरी येथे जिल्हा निर्मितीसाठी आंदोलन करण्यात आले होते. यावेळी ब्रम्हपुरी उपविभागातील पोलिसांच्या चमूची ड्युटी लावण्यात आली होती. यामध्ये तळोधी पोलिस स्टेशनमधील पोलिसांचाही समावेश होता. यात उमेश मस्के, नरेश निमगडे यांच्यासह अन्य एक कर्मचारीसुद्धा कर्तव्यावर होते. दरम्यान, आंदोलन सुरूच असताना मस्के, निमगडे व अन्य एक कर्मचारी असे तिघेजण कर्तव्यावर असतानाच ब्रम्हपुरी येथील एका बीअर दुकानात गेले. एवढेच नाही तर तेथे बीअर ढोसली. याबाबतच ब्रम्हपुरीपोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुधाकर आंबोरे यांना माहिती मिळताच ते त्या दुकानात गेले. ते तिघेही वर्दीवरच बीअर बारमध्ये दिसून आले. त्यांनी याबाबतची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांना पाठविली. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या संपूर्ण बाबींची चौकशी केल्यानंतर त्यांनी या दोघांनाही निलंबित केले आहे. 
त्यांच्यासमवेत असणारा तिसरा कर्मचारी मद्य पित नव्हता. परंतु, तोही मद्य दुकानात गेल्याने त्यावरही दुसरी कारवाई करण्यात येणार आहे.या कारवाईवरून कर्तव्यावर असताना दारू ढोसणाऱ्या पोलिसांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.