भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील माजरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार अजितसिंग देवरे यांच्या नेतृत्वात अवैध रेती वाहतुकीविरोधात राबविलेल्या मोहिमेत तीन दिवसांत तीन वाहनांवर कारवाई करण्यात आल्याने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,दि. १५ जून रोजी माजरी ठाणेदार अजितसिंग देवरे, पो.शि. अनिल बैठा दुपारच्या सुमारास गस्त करित असतांना त्यांना पळसगाव गावाजवळ एक हायवा क्र. एम.एच.34 बीजी 1935 हा रेतीची वाहतुक करतांना मिळुन आला. त्यावरिल चालक नामे लालाराम बिसेलाल निषाद रा.नंदोरी याने दाखविलेल्या रॉयल्टी पावत्यांवर पावत्यांच्या वैधतेच्या दिनांकात खाडोखोड दिसुन आल्याने सदर हायवा ट्रक हा पोस्टेस जप्त करुन मा.तहसिलदार सा.भद्रावती यांचेकडुन पावत्यांची तपासणी केली असता सदर पावत्या या अवैध असल्याबाबत समजुन आल्याने हायवा क्र. एम.एच.34 बीजी 1935 वरिल चालक नामे लालाराम बिसेलाल निषाद रा.नंदोरी व मालक नामे मनोज चिंचोलकर रा.वरोरा यांचे विरोधात अप क्र. 67/23 भादवि कलम 379,417,468,471,34 प्रमाणे दि. 18.06.2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दि.19.06.2023 रोजी मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे सपोनि अजितसिंग देवरे यांचे सुचनेवरुन पोहवा/ हरिदास चोपणे ,नापोशि/ अनिल बैठा , पोशि/ गुरु शिंदे अशांनी गस्त केली असता त्यांना वर्धा नदीवरील मांडवगोटा रेती घाटावरून रेतीची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर क्र.MH 34 CD 2067 हे आपल्या विना क्रमांकाचे ट्रॉलीसह रेती या गौण खनिजाची वाहतूक करतांना मिळुन आल्याने ट्रॅक्टर ,ट्रॉली व 1 ब्रास रेती सह एकुण 6,05,000/- रु कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन ट्रॅक्टर चालक नामे जितेंद्र सुधाकर खामणकर रा. मणगाव व मालक नामें महादेव लक्ष्मण खामकर रा.मणगाव यांचे विरोधात माजरी पोस्टेस अप क्र. 70/23 भादवि कलम 379,34 सहकलम 3/181 मोवाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास नापोशि /अनिल बैठा करित आहेत. दि.20.06.2023 रोजी रात्रीस मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे सपोनि अजितसिंग देवरे यांचे सुचनेवरुन पोहवा / 1839 बंडु मोहुर्ले व पोशि / भाऊराव हेपट अशांनी पळसगाव फाटा येथे रेती या गौण खनिजाची चोरटी वाहतुक करणारे विना क्रमांकाचे लाल रंगाचे महिंद्रा सरपंच कंपनिचे ट्रॅक्टर व ट्रॉली क्र.एम.एच.29 व्ही 5236 पकडुन एकुण 4,05,000/- रु किचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी नामे आशिष गणपत मडावी रा.निंबाळा ता.वणी व मालक नामे आकिब अहेमद पटेल रा.रज्जा नगर ,वणी यांचेविरोधात माजरी पोलीस ठाणे येथे अप क्र. 71/23 भादवि कलम 379,34 सहकलम 130,180,181(3) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन पुढील तपास पोहवा / हरिदास चोपणे करित आहेत