अमरावती:- अमरावती शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील होमिओपॅथि महाविद्यालयात शिकणाऱ्या २३ वर्षीय विद्यार्थीनीने गळफास (23-year-old student commits suicide in hostel) घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, अमरावती (Amravati suicide News) शहरातील राजापेठ येथील महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीने गळफास hanging घेत आत्महत्या suicide केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऋतुजा मेंढरे असे या २३ वर्षीय तरुणीचे नाव असून ती परभणी येथील रहिवासी आहे. या महाविद्यालयात (College) ती द्वीतीय वर्षाला शिकत होती.
विद्यार्थीनी महाविद्यालयामागे असलेल्या खासगी हॉस्टेलमध्ये (Private hostel) तिसऱ्या माळावर राहत होती. सकाळी (morning) तिच्या खोलीत कसलीही हालचाल न झाल्याने आणि ती खाली न आल्याने केअरटेकरला (Caretaker) संशय आला. यावेळी खोलीत जावून पाहताच ऋतुजाने गळफास घेत आत्महत्या (Suicide by hanging ) केल्याचे उघडकीस आले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी;(police) तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसून तरुणीने टोकाचे पाऊल का उचलले असावे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिस या आत्महत्येचा सखोल तपास करत आहेत.