'
30 seconds remaining
Skip Ad >

वडसा - आरमोरी: लग्नसोहळ्याहून परतताना भरधाव कार झाडावर आदळली : चिमुकल्याचा मृत्यू | Batmi Express

0

wadsa,wadsa accident,Gadchiroli News,Desaiganj News,Gadchiroli,Wadsa live,Wadsa  news,Wadsa News,Desaiganj,Gadchiroli Batmya,Armori,Armori Accident,Armori Live,Armori News,

गडचिरोली 
नातेवाइकाच्या लग्नसमारंभातुन परतताना भरधाव कार झाडावर आदळली. यात तीन वर्षांचा चिमुकला गतप्राण झाला, सुदैवाने कुटुंब बचावले असून सदर घटना वडसा -आरमोरी मार्गावरील कासवी फाट्याजवळ २३ एप्रिलला दुपारी साडेतीन वाजता घडली.

माहितीनुसार प्रमोद शरद डुंबरे (४०), दीक्षा प्रमोद डुंबरे (३७) रा. वैराग हे मुलगा शिवांश (६) व दुर्गांश (३) यांच्यासह कारमधून नातेवाइकाच्या लग्नासाठी बुद्धेवाडा ता. अर्जुनी, जि. गोंदिया येथे गेले होते. लग्न झाल्यावर ते गावी परतत होते. दुपारी ०३:०० वाजता त्यांची कार वडसा -आरमोरी मार्गावरील कासवी फाट्याजवळ आली. 

यावेळी प्रमोद यांचा कारवरील ताबा सुटला. त्यानंतर कार रस्त्यालगतच्या झाडावर आदळली. यात चौघेही जखमी झाले. त्यांना आरमोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून दुर्गांशला मृत घोषित केले. इतर तिघांवर उपचार सुरू आहेत. अपघात एवढा भीषण होता की, कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×