तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Chandrapur News: अंगणात झोपून असलेल्या महिलेवर अचानक वाघाचा हल्ला; महिला ठार | Batmi Express

Tiger Attack,Chandrapur News,Chandrapur Tiger Attack,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,Sawali,Sawali News,
Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli Tiger Attack,Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Tiger Attack

सावली ( सौरभ चौधरी ) :- वनपरिक्षेत्र अंतर्गत व्याहाड खुर्द उपवनक्षेत्रातील विरखल चक येथील महिला अंगणात झोपून असतांना मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास अचानक वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे. श्रीमती मंदाबाई एकनाथ सिडाम (53) रा. विरखल चक असे मृतक महिलेचे नाव आहे.

प्राप्त माहीतीनुसार, उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागातील नागरिक रात्रोच्या सुमारास बाहेर अंगणात झोपत असतात. त्याचप्रमाणे विरखल येथील महिला श्रीमती मंदाबाई एकनाथ सिडाम ह्या अंगणात झोपल्या असतांना मध्यरात्री 2 वाजताच्या दरम्यान त्यांच्यावर वाघाने हल्ला करुन फरफटत नेत असतांना आरडाओरड केली असता घरातील व्यक्ती जागी होऊन आरडाओरड केल्याने वाघ हा त्या महिलेला सोडून जंगलात पसार झाला. मात्र सदर महिलेचा जागीच मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती सावली वनपरिक्षेत्र व पाथरी पोलिसांना देण्यात आली. रात्रीच घटनास्थळ गाठून पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी सावली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. वनविभाग तर्फे तात्काळ परिवाराला 25 हजारांची मदत करण्यात आली आहे. मात्र वाघाच्या या दहशतीने परिसरात चांगलेच भीतीचे वातावरण पसरले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.