वडसा: मुकेश ने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा; कारण अस्पष्ट | Batmi Express

Wadsa,crime news,Gadchiroli,Crime,suicide,Wadsa News,Gadchiroli Suicide,Wadsa Suicide,Gadchiroli Batmya,Desaiganj,

 Wadsa,crime news,Gadchiroli,Crime,suicide,Wadsa News,Gadchiroli Suicide,Wadsa Suicide,Gadchiroli Batmya,Desaiganj,

गडचिरोली : चामोर्शी वरून वडसा येथे काम करण्यासाठी आलेल्या तरुणाने किरायाच्या रूम  मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 24 एप्रिल ला दुपारच्या सुमारास घडली. मुकेश गणपती सूरजागडे (३०, रा. तळोधी, ता. चामोर्शी) असे मयताचे नाव आहे. तरुण काम करण्यासाठी वडसा येथे आला होता.वडसा मधील भगतसिंग वॉर्डातील राजू प्रधान यांच्याकडे तो महिना भरापासून किरायाच्या रूममध्ये एकटाच राहत होता.

मुकेश सूरजागडे हा एका भंगारच्या दुकानात काम करत असल्याची माहिती मिळाली आहे.त्याने 24 एप्रिल ला दुपारी स्वतः दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. दरम्यान, बराच वेळ दरवाजा आतून बंद असल्याने घरमालकाने जवळील शेजाऱ्यांना तात्काळ बोलावले.

सर्वांनी मिळून तो दरवाजा तोडून पाहिले असता,  मुकेशने गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या घटनेची माहिती वडसा पोलिसांना देण्यात आली. ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.