वडसा: अंगावर वीज कोसळून ठार झालेल्या मृतकांच्या कुटुंबीयांना १६ लाख रुपयांची तात्काळ मदत | Batmi Express

Gadchiroli News,Lightning Strike,wadsa,Desaiganj News,Gadchiroli,Wadsa live,Wadsa news,Wadsa News,Desaiganj,Gadchiroli Batmya,

Gadchiroli News,Lightning Strike,wadsa,Desaiganj News,Gadchiroli,Wadsa live,Wadsa  news,Wadsa News,Desaiganj,Gadchiroli Batmya,

वडसा
(गडचिरोली) :- वडसा -कुरखेडा मार्गावरील दुग्ध डेअरी ( विसोरा ) (तुळशी फाटा) जवळ वीज पडून अख्खे कुटूंबच ठार झाल्याची घटना २४ एप्रिल २०२३ ला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.

भारत लक्ष्मण राजगडे (वय ३२ वर्षे) संगीतकार रा.आमगांव व त्यांची पत्नी अंकिता भारत राजगडे (वय ३० वर्षे ) दोघेही पती-पत्नी आपल्या दोन्ही लहान मुलांसह गरगळा येथुन लग्न लावून येत असतांना मार्गातच हलक्या पावसाची सुरुवात होऊन वीज कडाडने सुरू झाले. 

wadsa,Wadsa  news,Wadsa live,Wadsa News,Desaiganj,Desaiganj News,Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,Lightning Strike,

वीज कडाडत असल्याने राजगडे यांनी दुग्ध डेअरी ( विसोरा ) (तुळशी फाटा)  जवळील एका झाडाच्या खाली आसरा घेतला असता अचानक वीज अंगावर पडल्याने राजगडे कुटूंबातील चारही जण जागीच मृत्युमुखी पडले होते. घटनेची माहिती मिळताच आमदार कृष्णा गजबे,उपविभागीय अधिकारी लोंढे, तहसीलदार महाजन यांनी मृतकाच्या कुटुंबियांना सांत्वन देत दोन दिवसांतच शासकिय तरतुदीची प्रक्रिया पुर्ण करुन प्रति मृतकांना ४ लाख रुपये प्रमाने ४ मृतकांचे १६ लाख रुपयांचा धनादेश मृतकाची आई पुष्पा लक्ष्मन राजगडे,बहिण अंजु गडपायले, प्रिती केळझरकर,स्मिता भोसकर यांना बहाल करण्यात आला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.