'
30 seconds remaining
Skip Ad >

Eid: कोरचीत मुस्लिम समाज बांधवांनी श्रमदान व लोकवर्गणीतून उभारला मिनार (बुरुज) | Batmi Express

0

Gadchiroli  Live News,Gadchiroli,Korchi,Gadchiroli Batmya,

कोरची
: मुस्लिम धर्माच्या पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्यांमध्ये कोरची शहरातील मुस्लिम समाजाच्या बांधवांनी लोकवर्गणी व श्रमदानातून अंदाजे ७० फूट एवढा उंच मिनार (बुरुज) रमजान ईदपूर्वीच उभारलेला आहे. मिनार म्हणजे एक किंवा अधिक बाल्कनी असलेला मशिदीचा एक उंच सडपातळ टाँवर आहे. इस्लामिक श्रद्धा व प्रार्थना करण्यासाठी मुएझिन नावाच्या पवित्र माणसाने याचे आवाहन केले होते. त्यामुळे मशिदीजवळ मिनार उभारले जाते.

         सदर मिनार उभारण्यासाठी तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी वर्गणी गोळा करून मिनारचे (सिमेंट पार्ट) भाग गुजरातच्या एका खाजगी कारागिरकडे ऑर्डर केले. आणि हे पार्ट कोरचीला पोहचेपर्यंत आठ दिवस लागले. या पार्टची फिटिंग करायला राजस्थान वरून कारागीर कोरचीला आला होता. यानंतर कोरचीतील मुस्लिम बांधवांनी मिनार उभारण्याच्या कामासाठी रोजीने काम करणारे रोजगार बघितले पण रोजगार मिळाले नाही त्यामुळे तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्र होऊन मिनार उभारणीच्या कामाला सुरुवात केली. यात बासांची चैली बांधने, रेती, गिट्टी, सिमेंट, चा मसाला तयार करणे, सलाख कटिंग करून मिनार पर्यंत पोहचवण्यापर्यंतचे सकाळ पासून दुपारच्या भर उन्हात काम करून केला आहे.

          रमजानच्या पवित्र महिन्यात सर्व दिवस 'रोजा' (उपवास) करणारे सर्व रोजेदार दिवसभर अन्न पाणी घेत नाहीत यासाठी शारीरिक आणि मानसिक संयमाची फार आवश्यकता असते. कोरची शहरातील वार्ड क्रमांक-03 मधील मशिदीजवळ मीनार उभारणीच्या कामांमध्ये मुस्लिम बांधवांची संख्या चाळीसच्या वर होती ज्यामध्ये रमजानचे रोजे उपवास पकडणारे जवान युवा दहा ते पंधरा जण होते. मिनार चे भाग एवढे वजनी होते की एक दोघांनी ते उठत नसून त्याला वर चढविण्यासाठी उंच खेचण्यासाठी वीस ते पंचवीस जण लागत होते. मिनार फिटिंग व उभारणीच्या काम तब्बल तेरा दिवसात झाले. उद्देश एकच की रमजान ईद च्या आधी मिनार उभे करणे. आणि शेवटी रमजान ईद च्या आधी पेंटिंग व लाईटिंग लावून मिनार उभे झाले आहे. या मुस्लिम बांधवांच्या एकतेमुळे लोकवर्गणी व श्रमदानाने बाकी इतर समाजांना प्रेरणा मिळत आहे.


 मीनार उभे करण्यासाठी जवळपास पाच लाख रुपयाचं वर खर्च झाले आहे कोरची शहरातील व तालुक्यातीलच नव्हे तर तालुक्याबाहेरील मुस्लिम बांधवांना मिनार उभारणी बाबद माहिती मिळाली तर त्यांनी सुद्धा वर्गणी देऊन मदत केली आहे. मिनार उभारणीचा काम करते वेळी काही अडचण आलेली नाही तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी आपापल्या परीने मेहनत घेतली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×