ब्रम्हपुरी:- तालुक्यातील धानोलीपोहा चक येथे विज पडून इसमाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज दिनांक:- २२ एप्रिल २०२३ ला ५:३० वाजताच्या सुमारास घडली आहे.
श्री. नवलाजी बळीजी लडके वय अंदाजे ४० असे वीज पडुन दुर्दैवी मुत्यु झालेल्या इसमाच नाव आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की मृतक नवलाजी हे गावातील लोकांनी दिलेल्या माहिती नुसार घरच्या म्हशी राखायला गेला असल्याने चार पाच दिवसापासून तालुक्यातच नाही तर विदर्भात अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटा ने हजेरी लावली असुन आज सुद्धा अवकाळी पावसाने विजांच्या कडडाटासह हजेरी लावली त्या मध्ये म्हशी चारत असतांना नवलाजी च्या अंगावर विज पडून नवलाजीचा मृत्यु झाला.
मृतक नवलाजीच्या पच्छात्य पत्नी दोन मुले असा आप्त परिवार आहे. नवलाजी अत्यंत मनमिळावू स्वभावाचा व कुटुंबातील कर्ता इसम असुन त्याच्या जाण्याने लडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तसेच गावपरीसर शोकसागरात बुडालेला आहे.