तळोधी: दोन पोलीस कर्मचारी निलंबित | Batmi Express

Be
0

Talodhi,Talodhi Live,Talodhi News,Bramhapuri,Bramhapuri Live,Bramhapuri News,Bramhapuri Today,

तळोधी
बा: तळोधी बा पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना आर्थिक देवाण घेवानावावरून चंद्रपूर चे पोलीस अधीक्षक रविंद्र सिंग परदेशी यांनी पोलिस स्टेशन चे सहाय्यक फोऊजदार सुरेश पानसे व पोलीस शिपाई मनीष गेडाम यांना निलंबित केले.

नवानगर वार्डातील मायाबाई बोरकर यांच्या गोठ्यातून दोन बकरे व दोन शेळ्या चोरी गेल्या. त्याची तक्रार देण्यात आली. संशयित म्हणून त्याच वार्डात राहणार अश्विन मेश्राम या युवकाचे नाव समोर आले . चौकशी करिता मेश्राम यांना पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले व त्यांना मारहाण करून त्यांच्या कडून १५०००रु.पानसे व गेडाम या कर्मचाऱ्यांनी घेतले. व त्यापैकी पाच हजार रुपये मायाबाई ला दिले. मायाबाई ने ते पैसे दुसऱ्या दिवशी परत केले.

एकंदरीत हे सर्व प्रकरण पैसे घेऊन दाबन्याचा प्रयत्न हे दोन कर्मचारी करीत होते. या प्रकरणाची माहिती सामाजीक कार्यकर्ते अजीत सुकारे यांना मिळताच त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर, पोलिस अधीक्षक चंद्रपूर, विभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी यांना या प्रकरणा बाबत पत्रव्यवहार केला. तसेच विनाकारण मारहाण करून व जबरदस्तीने पैसे घेऊन मानसिक त्रास दिल्या बद्दल अश्विन मेश्राम यांनी सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दोन कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रार दिली होती, तसेच मायाबाई बोरकर यांनी सुद्धा मला न्याय मिळावा यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे दोनही कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली तसेच सर्वांचे बयान घेण्यात आले व सरते शेवटी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी तात्काळ दोनही कर्मचाऱ्यांना निलंबित केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->