कोरची : कोरची-मोहगाव रस्त्यावर ११ मार्चच्या संध्याकाळी साडे सातच्या सुमारास भीषण अपघात झाला. यामध्ये चार लोकांना गंभीर दुखापत झाली.
माहितीनुसार मोहगाव येथील लग्नसोळ्यातून छत्तीसगडकडे दुचाकी ने जाणारे कुमेश कुंजाम (१८), सुशील कुंजाम (२०), विनोद उईके (३३) व बिदेशी चंद्रवंशी (२०) यांनी समोरून पायी येणाऱ्या महिलांना दुचाकी ने धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, यामध्ये सुलोचना बखर (५०) व कुमारीन् जुडा (४५) यांचे पायाचे हाड मोडले व नर्मदा करशी (३८), सुरजाबाई करशी (३५), सुमन करसी (३५) यांना सुद्धा दुखापत झाली. या अपघातात उमेश कुंजाम व सुशील कुंजाम हे सुद्धा गंभीर रित्या जखमी झाले.
सदर घटनेची माहिती प्राप्त होताच प्रा. देवराव गजभिये, मनोज अग्रवाल, आनंद चौबे, सुरज हेमके, आशिष अग्रवाल, वसीम शेख, प्रा. मुरलीधर रुखमोडे, नसीम पठाण, अभिजीत निंबेकर, अंकित बीसेन आदींनी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त रुग्णांना रुग्णवाहिका व वसीम शेख यांच्या खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याची मदत केले. गंभीर दुखापत झालेल्या चार रुग्णांना पुढील उपचारासाठी गडचिरोली येथे रेफर करण्यात आले, असून सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.