बल्लारपूर: शहरातील स्लज गार्डन जवळ सायंकाळी भीषण अपघात झाला असून एक जण जागीच ठार झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले असल्याचे माहिती प्राप्त झाली आहे.
सविस्तर वृत्त याप्रमाणे कि तीन युवक मोटरसायकल क्रमांक MH 34 T 3654 ने चंद्रपूर ला जात असताना स्लज गार्डन, पेपर मिल गेट जवळ अपघात होऊन एकाचा जागेवरच मृत्यू झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.मृत्यू झालेल्या युवकाचे नाव नसीम अली खान वय ३२ वर्ष तर जखमी झालेले युवक नामे विनोद श्यामकुमार मेश्राम वय २८ वर्ष व अनिकेत अरविंद सोनवणे आहे. सदर तिन्ही युवक अष्टभुजा वार्ड चंद्रपूर चे रहिवासी आहेत.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.