'
30 seconds remaining
Skip Ad >

Suicide: नवविवाहितिने सासूरवाडीत गळफास घेऊन आत्महत्या; पती, सासू, सासरा व दिराला अटक | Batmi Express

0

Gadchiroli News,Kurkheda Suicide,Gadchiroli,Gadchiroli live,Kurkheda News,Gadchiroli Crime,Gadchiroli Suicide,kurkheda,

कूरखेडा
: तालूक्यातील खरकाडा येथे रविवार १२ मार्च रोजी नवविवाहिता हर्षदा महेश बंसोड (२३) या महिलेचा सासूरवाडीचा घरातच गळफास घेतलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली होती. या प्रकरणात मृतकाच्या वडीलांच्या तक्रारीवरून छळ करीत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गून्हा दाखल करीत आज सोमवार १३ मार्च रोजी पती, सासू सासरा व दिराला अटक करण्यात आल्याचे कळते.

देसाईगंज तालूक्यातील बोडधा येथील हर्षदा गायकवाड हिचा विवाह मागील वर्षी १९ एप्रील २०२२ रोजी खरकाडा येथील महेश बंसोड याचाशी झाला होता. घटनेच्या आदल्या दिवशी मृतकाने आपल्या वडीलाना फोन करीत घरी घेऊन जाण्याबाबत बोलली होती अशी माहिती आहे.

मात्र वडील तिच्या घरी पोहचण्यापूर्वीच तिच्या मृत्यु ची बातमी मिळाल्याने त्याना धक्का बसला. यावेळी त्यानी मूलीचे शवविच्छेदन कूरखेडा येथील रुग्णालयात करण्यास विरोध केल्याने तिचे शवविच्छेदन जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे करण्यात आले. यानंतर रात्री शव घेत येथील पोलीस स्टेशनला पोहचले व आपल्या मूलीला शारिरीक व मानसिक त्रास देत, आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याची तक्रार कूरखेडा पोलीस स्टेशन येथे दाखल केली व गून्हा दाखल करण्याच्या हमी नंतर शव घेत स्वगावी बोळदा येथे पोहचत रात्रीच तिथे मृतदेहावर अंतीम संस्कार करण्यात आला. 

कुरखेडा पोलीसानी या प्रकरणात आरोपी पती महेश बाबूराव बंसोड, सासरा बाबुराव ऋषी बंसोड, सासू उषाबाई बाबूराव बंसोड व दिर प्रणय बाबूराव बंसोड या चौघा विरोधात भारतिय दंड संहिता १८६० चा कलम ३०४ ब,३०६,३४ अन्वये गून्हा दाखल करीत आज सकाळी चौघांना अटक केल्याची माहिती आहे. घटनेचा तपास ठाणेदार संदीप पाटिल यांचा मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×