स्वगावी परताना मालवाहक ट्रकला दुचाकीची जबर धडक.! एक जागीच ठार एक जखमी | Batmi Express

Be
0
Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,Armori,Armori Accident,Armori News,Gadchiroli Accident,

वैरागड:- स्वगावी परत जात असताना सावलखेडा जवळून थोड्याच अंतरावर समोरून येणाऱ्या ट्रकला दुचाकीची धडक होऊन दुचाकी चालक जागीच ठार झाला तर दुसरा एक व्यक्ती गंभीर जखमी झाला.  ही घटना आज दिनांक 14 मार्च दुपारी दोनच्या वाजताच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील सावलखेडा या गावाजवळ घडली.  

या अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव ज्ञानेश्वर सहारे (37) रा. बेलगाव (ता. कुरखेडा) असे नाव असून अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव कोकसू नंदेश्वर (65) रा.येगलखेडा मृत ज्ञानेश्वर साहारे त्यांचे सासरे परसराम बंधू यांच्याकडे सकाळी पाहुणे म्हणून आले होते. दुपारी जेवणानंतर आपल्या स्वगावी परत जात असताना सावलखेडा जवळून थोड्याच अंतरावर समोर येणाऱ्या मालवाहक ट्रकला दुचाकीची धडक झाली त्यात ते जागीच ठार झाले

या अपघातात दुचाकी वर बसलेल्या दुसरा व्यक्ती गंभीर दाखल जखमी झाला असून प्राथमिक उपचारात जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे जखमीला भरती केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->