नागपूर ( Nagpur University): राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ( Rashtrasant Tukdoji Maharaj) नागपूर विद्यापीठाचे (Nagpur University) कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी ( Dr.subhashchaudhari ) यांच्या अडचणी मध्ये वाढ झाली आहे. नागपूर विद्यापीठात एमकेसीएलची वादग्रस्त नियुक्ती आणि इतर प्रकरणांत डॉक्टर चौधरींवर ठपका ठेवण्यात आलाय. या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी अजित बाविस्कर यांची चौकशी समिती नेमली गेली आहे. आणि विद्यापीठात एमकेसीएलला नियमबाह्य कंत्राट देणं. परीक्षाच उशिरा निकाल लावणे . यासह वेगवेगळ्या विषयासंदर्भात आमदार प्रवीण दटके (MLA Praveen Datke ) यांनी नागपूर विद्यापीठाच्या कारभाराबाबत विधिमंडळात विषय उपस्थित केला.
एमकेसीएलला काम देताना शासकीय सूचनांचं पालन न केल्याचे या समितीने म्हटले आहे . अनेक चुकांवर बाविस्कर समितीने बोट ठेवले.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.