- काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या घटनेचा जाहीर निषेध
गडचिरोली: भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांची वाढत चाललेली लोकप्रियता आणि हिडनबर्ग संस्थेने उघड केलेल्या अदानी समूहाच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासंदर्भात संसदेत काँग्रेस नेते राहुल गांधी सतत आवाज उचलत असताना त्यांचा आवाज दाबण्याकरिता नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारने राहुल गांधी यांच्यावर बिन बुडाचे आरोप करून सत्तेचा दुरुपयोग करत खासदारकी रद्द करण्याचा षडयंत्र केला, याचे निषेध म्हणून राहुलजी गांधी यांच्या समर्थनार्थ व नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारच्या निषेधार्थ आणि अदानी समूहाच्या घोटाळ्याची संयुक्त संसदीय चौकशीच्या प्रमुख मागणी करिता गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भाजप च्या हुकूमशाही धोरना विरोधात सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव तथा जिह्वा प्रभारी डॉ. नामदेव किरसाण, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, डॉ. चंदाताई कोडवते, भावनाताई वानखेडे, शहराध्यक्ष सतीश विधाते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्व्जीत कोवासे, माजी नगरसेवक रमेश चौधरी, महिला काँग्रेस अध्यक्ष ऍड. कविता मोहरकर, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, ग्राहक सेल अध्यक्ष भरत येरमे, पुष्पलता कुमरे कार्याध्यक्ष रोजगार सेल, रुपेश टिकले परिवहन सेल अध्यक्ष, आरीफ कनोजे अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष, सहकार सेल उपाध्यक्ष अब्दुलभाई पंजवाणी, राजेंद्र बुले वडसा तालुकाध्यक्ष, माजी जि. प. सदस्य विनोद लेनगुरे, माजी जि. प. सदस्य नंदू नरोटे, माजी. जि. प. सदस्य तथा साहित्यिक कुसुमताई आलाम, भाकप नेते तथा माजी जि. प. सदस्य अमोल मारकवार, सुनील चडगुलवार, सुरेश भांडेकर, पांडुरंग घोटेकर, नंदू नरोटे, राकेश रत्नावार, पुरुषोत्तम सिडाम, संजय चंने, दत्तात्रय खरवडे, सुभाष धाईत, दीपक मडके, ढिवरू मेश्राम, प्रभाकर कुबडे, अनिल कोठारे, विनीत पोरेड्डीवार, योगेंद्र झंजाळ, कृष्णजी धानफोले, माजीद सय्यद, मंगला कोवे, किशोर कोल्हटवार, छत्रपती धबधबे, विद्या कांबळे, अपर्णा खेवले, पूनम किरंगे, शेवंता हलामी, वसंत सातपुते, रमेश धकाते, नृपेश नांदनकर, भोलेनाथ धानोरकर, प्रफुल आंबोरकर, भैयाजी मुद्दमवार, नरेंद्र गजपुरे,नितेश राठोड, आशिष कामडे, प्रतीक बारसिंगे कमलेश खोब्रागडे, जावेद खान, सारिका कऱ्हाडे, शरद भजबुजे, घनश्याम मुरवतकर, शालिक पत्रे, चोखाजी भांडेकर, देवेंद्र पीपरे, कृष्णा झंजाळ, पुष्पा कोहपरे, समिता नंदेश्वर, शर्मिला कऱ्हाडे, राजाराम ठाकरे, सुदर्शन उंदीरवाडे, हेमंत मोहितकर सह मोठ्या संख्येने काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.