ब्रम्हपुरी: तालुक्यातील पिंपळगाव कोथूळना बोरगाव हा मार्ग प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेतून करण्यात आला मात्र या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत तसेच जागोजागी गिट्टी निघालेली आहे. नुकतेच या रस्त्याचे काम पंधरा दिवसाच्या अगोदर डागदुगी करण्यात आलेली होती परंतु काम निकृष्ट दर्जाचे झाल्यानें रस्त्याला खड्डे पडले व जिकडे तिकडे गिट्टी निघालेली असल्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्यांना मोठा त्रास होत आहे या रस्त्याने शाळेत जाणाऱ्या मुली मुले त्याचप्रमाणे कर्मचारी वर्ग शेतकरी त्याचप्रमाणे ब्रह्मपुरी ला कोणत्याही कामानिमित्त जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावे लागते, रस्त्याची दागदुगी चांगल्या पद्धतीने करीत नसल्यामुळे किंवा निकृष्ट काम करीत असताना वरिष्ठ बांधकाम अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे हा रस्ता पूर्ण खास्तावलेला आहे तेव्हा या रस्त्याकडे जनप्रतिनिधीने लक्ष द्यावे त्याचप्रमाणे संबंधित विभागाने याची दखल घेऊन हा रस्ता पावसाळ्यापूर्वी चांगला करावा अशी मागणी जनते कडुन केली जात आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.