तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

चंद्रपूर : एकाच आठवड्यात दोन बालविवाह रोखण्यास चाईल्ड लाईन व प्रशासनाला यश | Batmi Express

Bramhapuri,Bramhapuri Live,Bramhapuri Crime,Bramhapuri News,Gondpipari,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur Crime,

Bramhapuri,Bramhapuri Live,Bramhapuri Crime,Bramhapuri News,Gondpipari,Chandrapur,Chandrapur  News,Chandrapur Live,Chandrapur Crime,Chandrapur Crime News,

चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील बालिकेचा वय 17 वर्ष असताना बालविवाह तसेच ब्रह्मपुरी तालुक्यातील एका बालकाचा (वय 19 वर्ष) आणि मुलीचे वय 17 वर्षे असताना बालविवाह होणार होता. बालकल्याण समिती, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, महिला विकास मंडळद्वारा संचालित चाईल्ड लाईन, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चंद्रपूर आणि पोलीस स्टेशन, गोंडपिपरी व ब्रह्मपुरी यांच्या संयुक्त कार्यवाहीने दोन्ही बालविवाह थांबविण्यात चाईल्ड लाईन व प्रशासनाला यश आले.

गोंडपिपरी व ब्रह्मपुरी तालुक्यातील गावात बालविवाह होणार असल्याची माहिती चाइल्ड लाईनच्या 1098 या टोल-फ्री क्रमांकावर मिळाली. चाइल्ड लाइनने जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आणि बालकल्याण समितीच्या आदेशान्वये सदर गावी भेट देऊन दोन्ही कुटुंबाचे समुपदेशन केले. पालकांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत अवगत करण्यात आले. तसेच ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन येथे बालविवाहा बाबत माहिती दिली असता पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली.

त्यानंतर संबधित गावातील अंगणवाडी संविका आणि माध्यमिक शाळा यांच्याकडून वयाचा पुरावा मिळविला. तसेच ब्रम्हपुरी पोलीसांनी पाठपुरावा करीत सदर बालविवाह थांबविला. बालकांना व बालकांच्या कुटुंबाना बाल कल्याण समिती समोर उपस्थित राहण्यास सांगितले. 24 तासाच्या आत बालक व बालिकेच्या कुंटुबाला बालकल्याण समिती समोर उपस्थित करण्यात आले.

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार बालविवाह करणे कायद्याने गुन्हा असून त्यावर असणारा शिक्षा व दंड याबाबत माहिती दिली. यावेळी सरचिटणीस प्रभावती मुठाळ, चाईल्ड लाईन चंद्रपूरच्या संचालिका नंदाताई अल्लुरवार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दिपक बानाईत, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, बालकल्याण समिती अध्यक्षा क्षमा बासरकर व बाल कल्याण समितीच्या सदस्या यांच्या मार्गदर्शनात सदर कारवाई पार पडली.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.