ब्रम्हपुरी : तालुक्यातील अहेर नवरगाव येथे दिवसाढवळ्या अहोरात्र रेती उपसा सुरू आहे. त्यामुळे वैनगंगा नदी वाळू तस्करांमुळे संकटात सापडली आहे. अहेर नवरगाव परिसरात असलेल्या वैनगंगा नदी पात्रातून वाळूसाठी उघडपणे खोदकाम सुरू आहे. मात्र महसूल प्रशासन कोमात गेले असे चित्र समोर दिसत आहे. कारण रेती तस्करांना कोणाची भीती दिसत नाही आहे दिवसाढवळ्या सर्रासपणे मजुरांच्या साह्याने ट्रॅक्टर नदीमध्ये उतरवून खुलेआम रेती तस्करी करत आहे.
शहरातून दिवस-रात्र विनापरवाना रेतीची अवैधरीत्या तस्करी होत आहे.स्थानिक गावातील नागरिक रेतीतस्करांना विरोध करीत आहेत; पण वाळू तस्कर अरेरावीची भाषा करीत तक्रार केल्यास धमकी देतात.मात्र,यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
अहेर नवरगाव येथील काही नागरिकांनी गुरुवारी वैनगंगा नदीपात्रातून अवैधरीत्या रेतीची तस्करी करणाऱ्या एका टिप्परला अडवून विचारणा केली. त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचा वाळू परवाना नसल्याचे चित्र समोर येताच त्यांनी ११२ वर कॉल केला पण पोलिस प्रशासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. तब्बल दोन तास त्या टिप्परला अडवून ठेवले होते; परंतु कोणतेच अधिकारी,कर्मचारी कारवाई साठी धजावले नाहीत. अधिकारी,कर्मचारी या रेती तस्करांवर कारवाई का करत नाही याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.