मालेवाडा : प्राप्त झालेल्या माहितीनुसार पुराडा धनेगाव मार्गावर अनियंत्रित कारचा अपघात झाल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना काल रात्री अंदाजे 9.00 वाजता घडली.
सदर मुलगा पुराडा येथील असून त्याचे नाव गितेश्वर तिलकचंद महाजन असे आहे. सदर मुलगा पुराडा येथील विद्यालयांमध्ये बारावी मध्ये शिकत होता आणि त्याने कालच मालेवाडा येथील श्री साईनाथ विद्यालय येथे काल पेपर दिला होता. पेपर दिल्यानंतर तो रात्री अंदाजे नऊ वाजता मानपुर या आपल्या सासुरवाडीकडे कारने निघाला असताना अचानक त्याची कार अनियंत्रित होऊन झाडाला जाऊन आदळली त्यात त्या युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली.
सदर माहिती सकाळी पोलीस मदत केंद्र मालेवाडा येथील प्रभारी अधिकारी श्री. राठोड साहेब यांना मिळाली असता त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यासोबत त्वरित घटनास्थळ गाठून पंचनामा केला .पुढील तपास मालेवाडा पोलीस करीत आहेत.