SSC-HSC Exam 2023: दहावी आणि बारावी परीक्षेबाबत शिक्षण मंडळाकडून महत्वाची सूचना जारी करण्यात आली आहे, यंदा दहावी बारावीच्या परीक्षेचे नियम कडक करण्यात आले आहेत. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची चोरी करणे, प्रश्नपत्रिका विकणे-विकत घेतल्यास किंवा मोबाईल आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावर प्रसारित केल्यास परीक्षार्थी विद्यार्थ्याची परीक्षा रद्द करण्यात येणार तसेच विद्यार्थ्यास पुढील पाच वर्षासाठी Rusticate करण्यात येणार आहे.
याचबरोबर मंडळाने मान्यता न दिलेली साधने, साहित्य परीक्षा दालनात स्वत:जवळ बाळगन्यास, उत्तरपत्रिकेत-पुरवणीत प्रक्षोभक,अर्वाच्य भाषेचा वापर, शिवीगाळ लिहिणे किंवा धमक्या देणे तसेच बैठक क्रमांक,फोन नंबर ,भ्रमणध्वनी क्रमांक देऊन संपर्क साधण्यास विनंती करणे, अशी कृत्य आढळून आल्यास विद्यार्थ्यावर कारवाई करण्यात येईल.
याशिवाय परीक्षा सुरू असताना इतर परीक्षार्थ्यांबरोबर उत्तराच्या संदर्भात गैरहेतूने संपर्क साधणे, एकमेकांचे पाहून लिहिणे, अन्य परीक्षार्थ्यांस तोंडी उत्तरे सांगणे, याविषयी परीक्षार्थ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार - असेही शिक्षण मंडळाने सांगितले आहे
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.