Elon Musk : चंद्रपूरच्या नागरिकांनी दिसली एलन मस्क यांच्या 55 सॅटॅलाईटची स्कायलिंक ट्रेन | Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,Elon Musk,Elon Musk news,

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,Elon Musk,Elon Musk news,

चंद्रपूर:-
 चंद्रपूरच्या आकाशात नागरिकांनी अनुभवली एलन मस्क यांच्या 55 सॅटॅलाईटची स्कायलिंक ट्रेन. संध्याकाळी आकाशात ही ट्रेन दिसू लागल्याने खगोल अभ्यासकांमध्ये कुतुहल निर्माण झाले. मराठवाड्यातही आकाशात विजेचा गोळा चमकल्याचा अनुभव नागिकांना आला.

चंद्रपुरात गुरुवारी संध्याकाळी सात वाजून वीस मिनिटांच्या सुमारास आकाशात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारी ठिपक्यांची एक प्रकाशमान रेषा दिसू लागली. याआधी चंद्रपूरच्या आकाशात सॅटेलाईटचा तुकडा व धूमकेतू दिसल्याने नागरिकांमध्ये याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र, ही प्रकाशाची रेष दुसरे तिसरे काही नसून एलन मस्क यांची स्कायलिंक ट्रेन असल्याचे पुढे आले आहे.

भक्कम इंटरनेट जोडणी साठी अवकाशात अशा प्रकारच्या 55 सॅटेलाईट ची एक ट्रेन सोडण्यात आली असून तीच चंद्रपूरच्या आकाशात दिसल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. आकाशात अशा प्रकारे ही स्कायट्रेन भविष्यात अनेकदा दिसू शकते असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.