आरमोरी: गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी-वडसा रस्त्यावर काल सायंकाळच्या ७:४५ वाजताच्या सुमारास 5 पट्टेदार वाघ दिसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. वृत्तानुसार, संध्याकाळी 5 पट्टेदार वाघ महामार्गावरून प्रवास करीत होते. त्यामुळे आरमोरी-वडसा या मार्गावरून जाणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
5 पट्टेदार वाघ दिसल्याने परिसरातील लोकांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे, कारण वाघ हा वन्य प्राणी आहे आणि त्यामुळे मानवाला धोका निर्माण होऊ शकतो. आरमोरी-वडसा रोड महामार्गावरून प्रवास करताना नागरिकांनी सावधानी वगळावी, असे आवाहन वनविभागाने आवाहन केले आहे.
दरम्यान, आजूबाजूच्या गावांना सावधगिरी बाळगण्यासाठी आणि वाघ दिसल्यास तत्काळ कळवण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी जनतेला एकट्याने किंवा योग्य खबरदारीशिवाय जंगलात जाऊ नये असा सल्लाही दिला आहे.
वनविभागाने जनतेला आश्वासन दिले आहे की ते परिसरातील मानव आणि वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना करत आहेत. त्यांनी लोकांना सहकार्य करावे आणि वाघ दिसल्यास किंवा संबंधित घटना तात्काळ कळवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Video Link: Click Me
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.