सावरगाव येथील कोतवालाने केली आत्महत्या केली | Batmi Express

Be
0

Chandrapur News,Talodhi Suicide,Chandrapur,Talodhi,Chandrapur Suicide News,Talodhi Live,Talodhi News,

सावरगाव
: तळोधी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वलनी येथे कोतवालाने घरात कुणीही नसताना सिलिंग पंख्याला इलेक्ट्रिक वायर बांधून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी घडली. अनिल हरीजी गेडाम (४०) असे मृतकाचे नाव असून तो सावरगाव येथील तलाठी कार्यालयात कोतवाल पदावर कार्यरत होता.

तालुक्यातील वलनी येथील रहिवासी असलेला व सावरगाव येथील तलाठी कार्यालयात कोतवाल पदावर कार्यरत असलेला अनिल गेडाम याने पत्नी मिरची तोडायच्या हंगामासाठी बाहेर गावाला गेली असताना घरातील सिलिंग पंख्याला इलेक्ट्रिक वायर बांधून गळफास घेतला. याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. दरम्यान येथील पोलीस पाटील यांनी तळोधी पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली. पत्नी बाहेरगावी कामावर, मुलीआश्रमशाळेत शिकायला आणि आई मुलीकडे राहत असल्याने घटनेच्या दिवशी अनिल घरी एकटाच होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->