गुनेश काटगाये - केशोरी :- प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार केशोरी जवळील वडेगाव / बंध्या येथील आशा संजय ताडाम (वय 30 वर्ष ) या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार झाल्याची माहिती प्राप्त झालेली आहे.
सदर महिला जंगलात असलेल्या शेतात गेली होती अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून आशा तडाम या महिलेला जागीच ठार केले. सदर घटनास्थळी अर्जुनी मोरगाव क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे घटनास्थळी भेट देऊन वन विभागाच्या कर्मचाऱ्यांशी याबाबत चर्चा करून या वाघाला तात्काळ जेरबंद करावे अशी मागणी आमदारांनी वन विभागाकडे केली.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.