गडचिरोली: मौजा- कापेवंचा तालुका अहेरी जंगल परिसरात झालेल्या पोलीस नक्षलवादी चकमकाची दंडाधिकारी चौकशी सुरु | Batmi Express

Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli live,Gadchiroli Live News,Gadchiroli Naxal,Gadchiroli News,


गडचिरोली
:- सर्व जनतेला सुचित करण्यात येते की, मौजा- कापेवंचा तालुका अहेरी जिल्हा गडचिरोली या जंगल परिसरात दिनांक 28.09.2022 ते 29.09.2022 रोजी झालेल्या पोलीस नक्षलवादी यांच्यात सशस्त्र चकमकीत एक महिला नक्षल नामे- नंदे जोगा कुडम वय 30 वर्ष, रा.गंगाराम ता. ताडवाही जि. मुलंगू (तेलंगाना) मुळ पत्ता रा. रायगुडा ता.कोंन्टा जि. सुकमा (छ.ग.) ठार झाल्या असुन, ठार झालेल्या मृतकाचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांचे आदेश क्र. कार्या-2/अका.दंडा/कावि/2153/2022, दि.07 ऑक्टोंबर 2022 अन्वये मृत्युच्या कारणांचे दंडाधिकारीय तपास/ चौकशी करणेकरीता उपविभागीय दंडाधिकारी, अहेरी यांची नियुक्ती केलेली असल्याने उपविभागीय दंडाधिकारी न्यायालय, अहेरी येथे प्रकरण सुरु आहे. करीता याबाबत कोणाचे काही उजर/ आक्षेप असल्यास उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय येथे दिनांक 03.02.2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत लेखी आक्षेप सादर करावे. विहित कालावधीनंतर उजर/आक्षेप प्राप्त झाल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. सदर प्रकरणाची नियमानुसार चौकशी करुन अहवाल तयार करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, अहेरी यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.