अहेरी, (वा.). तालुक्यातील पेठा (देचली) येथील रहिवासी असलेली व स्थानिक भगवंतराव कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीस पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी अहेरी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
प्राप्त माहितीनुसार तक्रारदाराचा मुलगा सपनिक कामानिमित्य अहेरीत वास्तव्याला आहे. त्यांचेसोबत 17 वर्षीय बहीण राहत असून ती शिक्षण घेत आहे. दरम्यान सदर अल्पवयीन बहिण घरी न आल्याने चौकशीअंती पेठा येथील निवासी वडिलांना याची माहिती देण्यात आली. अहेरी येथे शोधाशोध केली असता ती आढळून न आल्याने पेठा येथीलच एक विद्यार्थी. घरी नसल्याची बाब तक्रारदारांना कळली. दरम्यान दोन दिवसानंतर संबंधिताने पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीच्या भावाच्या मोबाईलवर लग्न केल्याचे फोटो पाठविले. त्यामुळे संबंधित पालकाने अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची तोंडी तक्रार अहेरी पोलिस ठाण्यात केली. सदर प्रकरणाचा पुढील तपास अहेरी पोलिस करीत आहेत.